सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकताच गावभेट व जनसंवाद दौरा केला होता. आता शनिवारी 20 जुलै पासून ते सांगोला तालुक्यातील काही गावांमध्ये आपला गावभेट व जनसंवाद दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते गावातील वाड्यावस्त्यांवर जाऊन नागरिकांचे प्रश्न,व्यथा, अडीअडचणी जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न देखील करणार आहेत.
शनिवारी म्हणजेच 20 जुलैला ते पाचेगाव बु या गावातील बिलेवस्ती, घोडकेमळा, गावभाग, ग्रामपंचायत समोर तसेच किडबिसरी येथील गावभाग, टेपेवस्ती, घोगरेवस्ती, देवकतेवस्ती तसेच तिप्पेहली येथील शिवेचीवस्ती, मधलावाडा, गावभाग, मोहिते मळा व जुनोनी येथील गावभाग, काळूबाळूवाडी, कांबळे बेंदवस्ती, बळवंतमळा, ढोलेवस्ती तंडेवस्ती या ठिकाणी जाऊन सामान्य जनतेच्या अडचणी त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत.
तसेच रविवारी 21 जुलैला ते लोटेवाडी येथील जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी, सातारकर वस्ती व इटकी येथील गुलाब सावंत वस्ती, पिंटू कचरे वस्ती, गावभाग, बुद्धविहार या ठिकाणी आपला गावभेट जनसंवाद दौरा करणार आहेत. त्यामुळे या गावभेट दौऱ्यात सांगोला तालुक्यातील सर्व बंधू भगिनींनी युवक युवतीनी उपस्थित रहावे.