धक्कादायक! मोहोळ येथे आणखी एका डॉक्टर महिलाची आत्महत्या….

मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील महिला डॉक्टरने औषध पिऊन आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.पंढरपूर जयश्री गवळी शहर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.डॉ. जयश्री प्रशांत गवळी (वय ३८) असे मृत महिला डॉक्टराचे नाव आहे. पेनूर येथील साई कृपा हॉस्पिटलमध्ये पती डॉ. प्रशांत केराअप्पा गवळी यांच्यासोबत स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून डॉ. जयश्री गवळी सेवा देत होत्या.

गेल्या दहा ते बारा वर्षांपासून साईकृपा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना गवळी दाम्पत्य सेवा देत होते. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास डॉ. जयश्री गवळी या बेशुध्द अवस्थेत आढळून आल्या. त्याना तातडीने पंढरपूर येथील लाइफ केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले.उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम झाल्यावर डॉ.जयश्री गवळी यांचा मृतदेह पेनूर येथे आणण्यात आला.रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. जयश्री गवळी यांच्या मागे पती, दोन मुली, व एक मुलगा आहेत.