इचलकरंजी महानगरपालिकेला वीस कोटी रुपये मंजूर!

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात अनेक विकास कामांना गती मिळालेली आहे. अनेक नेत्यांकडून इचलकरंजी शहराच्या विकासामध्ये भर पडलेली आपल्याला पाहायला मिळतच आहे. अशातच इचलकरंजी महानगरपालिकेसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेली आहे. कोल्हापूर जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला होता. कोल्हापूर जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या पाठपुराव्याला मोठे यश लाभलेले आहे.

इचलकरंजी महानगरपालिकेला कोल्हापूर नगरोथान योजनेतून 20 कोटी मंजूर झालेले आहेत. त्यामुळे इचलकरंजी महापालिकेच्या विविध कामांना गती मिळणार आहे आणि सर्व कामे मार्गी लागणार आहेत. म्हणजे इचलकरंजीच्या गतवैभवात आता आणखीन वाढ होणार आहे.