राज्यात सर्वत्र मान्सूनने जोर धरला आहे. मुंबई आणि कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. परंतु आता विदर्भातही अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सूर्यापल्ली गावात शाळेत दुपारपासून पाणी शिरू लागले. पाण्याचा वाढत्या वेगामुळे 120bविद्यार्थी शाळेत अडकले.
पाऊस कमी होण्याची वाट पालक आणि प्रशासन पाहत होते. अखेरी रात्री पाऊस कमी झाल्यानंतर रेस्क्यू ऑपेरशन सुरु करण्यात आले. रात्री दोन वाजता सर्व विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आले.गडचिरोली जिल्ह्यातील सूर्यापल्ली गावात व माडेल शाळेत गुरुवारी तलावाचे पाणी शिरल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. सिरोंचा तालुक्यातील रामजापूर येथील माडेल शाळेत तीन ते चार फूट पाणी शिरले. शाळेत 120 विद्यार्थी होते.
त्या विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू करावे लागले. पोलीस निरीक्षक व त्यांचे टीमने जवळपास 120 विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले. कारमेल शाळेतून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयमध्ये या विद्यार्थ्यांना सुरक्षित हलविण्यात आले. रात्रीच्या अंधारात हे ऑपरेशन सुरु होते. रात्रभर पाऊस सुरु असताना हे रेस्क्यू करावे लागले. सर्व विद्यार्थी सुखरुप निघाल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला.