लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी…..

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केले होते अन या अशा महिलांना अजून पैसे मिळालेले नसतील त्यांना सप्टेंबर महिन्यात 4500 रुपये मिळणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या अन अर्ज मंजूर झालेल्या महिलांना 19 सप्टेंबर 2024 पर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे 4500 दिले जाणार आहेत.

सरकारने याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही मात्र 19 सप्टेंबर पर्यंत या योजनेचे साडेचार हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.पण, इथे एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज केला असेल त्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ मिळणार आहे.

म्हणजेच सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना फक्त पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. तसेच, ज्या महिलांनी अजून अर्ज केलेले नसतील त्या महिलांना आता फक्त अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज करता येणार आहेत.