आज होणार भारत आणि पाकिस्तान सामना! कधी आणि कुठे पाहता येणार

आजपासून श्रीलंकेतील डंबुला येथे महिला आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाला अ गटात ठेवण्यात आले असून भारताचा पहिला सामना आज कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

त्याचबरोबर आज संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळ यांच्यातही सामना रंगणार आहे. आज होणारा भारत आणि पाकिस्तान सामना किती वाजता सुरु होणार आणि कुठे पाहता येणार ते जाणून घेऊयात…

टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड शानदार आहे. या फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 14 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 11 सामन्यांमध्ये विजय मिळवला तर पाकिस्तानला केवळ तीन सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे.

त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. भारत आणि पाकिस्तान सामना आज सायंकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर हा सामना प्रसारित केला जाणार आहे. तसेच भारतीय चाहत्यांना हॉटस्टार ॲपवर या रोमांचक सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

महिला अशिया कप ही स्पर्धा 19 ते 28 जुलै दरम्यान श्रीलंकेतील डंबुला येथे होणार आहेत. या स्पर्धात एकूण 15 सामने खेळले जाणार आहेत. तर उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 26 जुलैला होणार असून अंतिम सामना 28 जुलैला होणार आहे.