इचलकरंजी शहरातील विविध कामांसाठी २१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून चार कोटी रुपये, नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून सात कोटी रुपये, अग्रिशमन सेवांचे बळकटीकरण योजना (जिल्हास्तर) अंतर्गत एक कोटी रुपये आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनांतर्गत नऊ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत इचलकरंजी शहरातील विविध कामांसाठी २१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महापालिकेतील बांधकाम विभाग आवश्यकते प्रमाणे विविध कामांचा समावेश करून प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हास्तरावर पाठविणार आहे. यातून शहरातील रखडलेली अनेक कामे मार्गी लागणार आहेत.