Googal कडून महत्वाची सर्व्हिस होणार बंद!

गुगलची सुरुवात झाल्या क्षणापासून आजच्या दिवसापर्यंत या माध्यमात काळानुरूप अनेक बदल करण्यात आले. त्यातच आता आणखी एका बदलाची भर पडली असून, यावेळी मात्र युजर्सना 440 वोल्टचा झटका बसला आहे. येत्या काळात गुगलकडून वेबसाईटची लांबलचक लिंक लहान करता येण्याची मुभा असणारी सेवा बंद करण्यात येणार आहे.

‘goo.gl’ या नावानं वापरात असणाऱ्या या सेवेचं कामकाज 25 ऑगस्ट रोजी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळं येत्या काळात तुम्ही ‘goo.gl’ च्या नावानं काही शोधण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या स्क्रीनवर एरर दिसू शकतो.