सोन्याचा भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर, तोळ्याला 75 हजार रुपये मोजावे लागणार तर……

 सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांमध्ये उच्चांकी वाढ दिसत असून आतापर्यंतची ही सर्वात विक्रमी भाव वाढ ठरली आहे. सध्या पितृपक्षामुळे सराफा बाजार सुस्त असला तरी देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याची किंमत 75 हजार रुपयांच्या ही पुढे गेली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी 75 हजार 730 रुपयांवर पोहोचला. चांदीचा भावही 90 हजारांच्या पुढे गेल्याचे दिसतंय. 

देशाच्या राजधानीत दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 75 हजार 420 रुपये झाला असून प्रति दहा ग्रॅम साठी 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,135 रुपये झाली आहे. चांदीची किंमत किलोमागे 92 हजार 720 रुपये झाल्याने सोन्या चांदीचे दर ऐकूनच खरेदीदारांना घाम फुटला आहे.