मोठी बातमी! आजपासून महाराष्ट्रात……

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येत आहे. काही ठिकाणी तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेले आहे.राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये सूर्य जणू आग ओकत असल्याची परिस्थिती राज्यात पाहायला मिळतेय.

अशातच मात्र राज्यात आजपासून पुढील काही दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावांनी हा हवामान अंदाज दिला आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपासून अर्थातच आठ एप्रिल पासून ते 13 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाला पूर्व विदर्भापासून सुरुवात होईल असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पूर्व विदर्भात सात एप्रिल पासूनच पावसाला सुरुवात होणार असे म्हटले होते. तसेच पश्चिम विदर्भात आठ एप्रिल पासून पावसाला सुरुवात होणार असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे.