राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील सध्या सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावभेट तसेच जनसंवाद दौरा करत आहेत. ते अगदी सांगोला तालुक्यातील वाड्यावस्त्यांवर जाऊन सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी व्यथा जाणून घेत आहेत. त्यांच्या या गावभेट जनसंवाद दौऱ्यामध्ये अनेक अडचणींचा निपटारा देखील झालेला पाहायला मिळत आहे.
शनिवारी 20 जुलै आणि रविवारी 21 जुलै रोजी त्यांनी सांगोला तालुक्यातील अनेक गावात आपला जनसंवाद दौरा केला. शनिवारी त्यांनी पाचेगाव येथील बिलेवस्ती, घोडकेमळा, गावभाग किडबिसरी येथील देवकतेवस्ती, टेपेवस्ती आणि गावभाग तिप्पेहळी येथील शिवेचीवस्ती, मधलावाडा आणि मोहितेवस्ती आणि गावभाग तसेच जुनोनी येथील बेंदवस्ती, काळूबाळूवाडी, बळवंतमळा, ढोले तंडे वस्ती आणि जुनोनी गावभाग परिसरात
तर रविवारी लोटेवाडी गावातील सातारकरवस्ती, नवी लोटेवाडी, जुनी लोटेवाडी आणि इटकी गावातील डोंगरे सावंत वस्ती, चव्हाण वस्ती, बुद्ध विहार, पिंटू करचे वस्ती तसेच गावभाग इटकी या परिसरातील नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.
सर्वसामान्य लोक देखील त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधत होते. पाचेगाव बू. येथील महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच शेती आणि कौटुंबिक समस्याबाबत आबांच्या समोर आपल्या व्यथा देखील मांडल्या आणि त्या दिपकआबांनी शांतपणे सर्व समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर मार्ग देखील काढून महिलांना दिलासा दिला.
ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी दिपकआबा गावभेट दौऱ्यामध्ये रात्री दहा वाजेपर्यंत लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. गाव खेड्यातील नागरिकांच्या पिण्याचे पाणी, वीज, रस्ते तसेच अन्य महत्त्वाचे प्रश्न दिपकआबा सोडवत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
त्यांच्या या गावभेट दौऱ्याला नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यांच्या या गावभेट दौऱ्याला जनता दरवाजाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यात त्यांच्या या गावभेट दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे.