मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिना पंधराशे रुपये मिळणार आहेत. मात्र या योजनेचा फॉर्म भरताना महिलांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अर्ज भरण्यासाठी अनेक ठिकाणी महिलांची झुंबड उडत आहे. यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
याचा विचार करून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे वाळवा तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ माने यांनी भारतीय जनता पार्टी आणि निशिकांतदादा युथ फाऊंडेशन यांच्यावतीने आष्टा शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मोफत फॉर्म भरण्याची व्यवस्था केली आहे. आष्टा येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले जात आहेत. याला शहरातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभतो आहे. तीन दिवसात जवळपास 400 महिलांचे फॉर्म भरण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात अर्ज भरण्याची सोय झाल्याने महिला वर्गात समाधानाचे वातावरण आहे.