आष्टा शहरात विकासकामे सुरू असून चितारे कॉलनीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ८ लाख ४५ हजार मंजूर झाले आहेत. ही सर्व कामे दर्जेदार होतील याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीण माने यांनी केले.
ते म्हणाले, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहेत. यावेळी संजय सावंत, अरबाज मुजावर, संतोष घस्ते, सुशांत टोमके, दत्तात्रय कोळेकर, बाहुबली सरडे, प्रथमेश ढोले, लोकेश दिवटे, लखन मंडले, विशाल आडके, सुरेश मोटकट्टे, समीर पटवेगार, उपस्थित होते. डॉ. विपुल गुरव यांनी स्वागत केले.
