आष्टा ग्रामीण रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ३५ लाख ३६ हजार आणि नवीन इमारतीसाठी जिल्हा नियोजनमधून ४५ लाख ७८ हजार असा एकूण ८१ लाख १४ हजार रुपयांचा निधी पालकमंत्री सुरेश खाडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण माने यांनी दिली. प्रवीण माने म्हणाले, लवकरच तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात येणार आहे.
यामध्ये प्रयोगशाळा, मेडिकल स्टोअर, विस्तारित वार्ड, वैद्यकीय अधिकारी कक्ष (स्वच्छतागृहासह ), कर्मचारी कक्ष समावेश आहे. त्याचबरोबर दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ३५ लाख ३६ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. या ८१ लाख १४ हजारांच्या निधीतून ग्रामीण रुग्णालयाचे विविध प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे…
