सांगोल्यात पोलीस शिपायासह खाजगी इसम अँटी करप्शनच्या ताब्यात

अलीकडच्या काळात गुन्हेगारी प्रकारात खूपच वाढ झालेली आपणास पहायला मिळत आहे. लाचलुचपत घेऊन अनेक गुन्हे दबवले जातात्त. अशातच सांगोल्यात एक लाचलुचपतीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. दाखल गुन्ह्यात कलम वाढ न करता अटक न करता जामिनावर सोडण्यासाठी ४५ हजार रुपये मागून तडजोडी करून २५ हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस शिपाईसह खाजगी इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. पो.शि. सोमनाथ बबन माने, नेमणुक सांगोला पोलीस ठाणे व खाजगी इसम पवार असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. यातील तक्रारदार यांचे व त्यांचे मुलांचे विरुध्द सांगोला पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हयात कलम वाढ न करुन अटक न करता जामीनवर सोडण्यासाठी व गुन्हयाचे तपासामध्ये मदत करणेसाठी पो.शि. सोमनाथ माने व खाजगी इसम पवार यांनी प्रथम ४५००० रुपये लाचेची मागणी केली होती अशी तक्रार प्राप्त झाली.

दिनांक २२/०७/२०२४ रोजी पडताळणी कारवाईमध्ये प्रथम ३०,००० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २५००० रुपये लाच रक्कम पोशि सोमनाथ माने यांनी स्वीकारण्याचे तयार दर्शवुन सदरची २५००० लाचेची रक्कम खाजगी इसम पवार यांच्या हस्ते स्वीकारले असल्याने दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.