अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. ‘हम साथ साथ है’ सिनेमातील सैफ – करिश्मा यांची केमेस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. रिल लाईफमधील दोघांची जोडी रियल लाईफमध्ये पाहाण्यासाठी चाहते उत्सुक होते. पण असं काहीही झालं नाही. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री करीना कपूर हिने मोठा खुलासा केला आहे. सैफ मला कायम म्हणतो बरं झालं करिश्मासोबत लग्न केलं नाही..’ असं म्हणत करीना हिने मजेशीर किस्सा सांगितला आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत करीना कपूर हिने सैफसोबत असलेल्या नात्यावर मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘सैफ आणि माझ्यामध्ये कामय भांडणं होत असतात. भांडणाचा एक विषय असतो ते म्हणजे एसीचं तापमान… मला एसीचं तापमान 20 डिग्री हवं असतं. सैफला प्रचंड गरम होतं त्यामुळे तो कायम 16 वर एसीचं तापमान ठेवतो. भांडणं झाल्यानंतर 19 वर एसीचं तापमान ठेवायचं असं आमचं ठरतं. एसीमुळे अनेक घटस्फोट देखील झाली आहेत.
पुढे करीना म्हणाली, पण जेव्हा करिश्मा घरी येते, तेव्हा ती गुपचूप एसीचं तापमान 25 वर ठेवते. सैफ आमच्यासोबत जेवायला बसतो त्याला फार गरम होतं. त्यामुळे सैफ कायम म्हणतो, बरं झालं लोलोसोबत लग्न केलं नाही, बेबोसोबत लग्न केले. कमीत-कमी 19 वर तरी प्रकरण सेटल होतं. सांगायचं झालं तर, करीना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते.