इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी….

सध्या सगळीकडेच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होत असल्यामुळे अनेक नद्यांच्या पाणी पतळीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे महापुराचा धोका संभवतो आहे. जिल्ह्यात, शहरात पुऱ्या सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. धरण तसेच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ झाल्याने रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम देखील झालेला आपणास पाहायला मिळत आहे.

इचलकरंजी महानगरपालिकेतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली दिसत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ६४ फूट ८ इंच इतकी आहे. तर इशारा पातळी 68 फूट व धोका पातळी 71 फूटावर आहे.

संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. तसेच इचलकरंजी महापालिका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून पूरबाधित क्षेत्र असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढत होत असून पाणी नागरी वस्तीकडे पसरू लागले आहे. काल रात्री अकरा वाजता यशोदा पुलाच्या पर्यायी रस्त्यावर पाणी आल्याने कर्नाटकला जोडण्यात राज्यमार्ग मरगुबाई मंदिर येथे आपत्ती व्यवस्थापन व पोलीस प्रशासनाने बॅरिगेट लावून वाहतुकीसाठी बंद केला आहे.

तसेच पेट्रोल पंप व यशोदा फुलाच्या अलीकडे देखील बॅरिकेट लावून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कर्नाटक रस्त्याकडून इचलकरंजीकडे येणारा रस्ता शिरदवाड येथे पेट्रोल पंपासमोर बंद करण्यात आला आहे.

त्याचबरोबर हुपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने हुपरीचा मार्ग बंद करण्यात आला आहे. पंचगंगा पूलाचा मार्ग महाराष्ट्र कर्नाटकला जोडणारा राज्य मार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच वरदळ असते. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून हा मार्ग बंद झाल्याने या मार्गावर शुकशुकाट पसरला आहे.