वारणा कोयना धरणातून विसर्ग सुरू, कृष्णेची पाणीपातळी २७ फूटावर

सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस असून २४ तासांत कोयना धरण येथे १६४, तर नवजा येथे १४५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून एक हजार ५० क्युसेक पाणी सोडले आहे; तसेच वारणा (चांदोली) धरण ८२.५१ टक्के भरले असून मंगळवारी दुपारपासून धरणाचे चार वक्राकार दरवाजे उचलून दोन हजार १५२ क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून एक हजार ६४८ कयुसेक असा एकूण तीन हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूआहे. यामुळे वारणा, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. सांगली आर्यविन येथे कृष्णेची पाणीपातळी २७ फुटांना स्थिर आहे.

कृष्णा नदीची आजची पाणी स्थिती

पाणीपातळी फूट इंचामध्ये
कृष्णा पूल कराड – १४.८
बहे पूल – ९
ताकारी पूल – २७
भिलवडी पूल – २८.४
आर्यविन – २७
राजापूर बंधारा – ४१.५
राजाराम बंधारा – ४०.८