इचलकरंजीकरांना दिलासा…

इचलकरंजी वस्त्र नगरी म्हणून ओळखली जाते. कोरोना काळामध्ये इचलकरंजी शहरातील उद्योगधंदे ठप्प झाले होते हाताला काम नसल्यामुळे नागरिकांवर रोजच्या भाकरीसाठी ही कसरत करावी लागत होती. त्यामुळे कोरोना काळामध्ये घरफाळा, पाणीपट्टी थकबाकीत गेली होती. मात्र यंदा त्यांची वसुली झाली.

शहरवासीयांना जितका वेळ पाणी देता त्याच प्रमाणात पाणीपट्टी आकारण्यात यावी असे पत्र खासदार धैर्यशील माने यांनी आयुक्त प्रकाश दिवटे यांना पाठवले. या पत्रामुळे पाणी न पिताही प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणाऱ्या लोकांना चांगला दिलासा मिळालेला आहे. तसेच कोरोना काळामध्ये 29 हजार तसेच त्यावरील व्याज व दंड माफ करावे अशा सूचना ही माने यांनी पत्रातून केली आहे. यामुळे मिळकत धारकांना दिलासा मिळणार का हे पहावे लागणार आहे.