मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली….

कोल्हापुरात पावसानं जोर धरला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातले ओढे नाले भरून वाहत आहेत.पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या ४२ फुटांवर पोहोचलेली आहे. त्यामुळे पंचगंना नदी धोका पातळीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीचा धोका शहरात निर्माण झाला आहे. शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी भागात पावसाचं धुमशान सुरू आहे. सर्वांना सावधतेचा इशारा दिला आहे.


कोल्हापूर प्रमाणेच इचलकरंजी, शिरोळ, कागल, आजरा, चंदगड येथे देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. वाहतुकीवर सर्वात मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातले 30 हून अधिक मार्ग बंद झालेले आहेत. केर्ली नजीक रस्त्यावर पाणी आल्यामुळे कोल्हापूर ते रत्नागिरी हा मार्ग देखील बंद झाला आहे. वाढता पासूस आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने त्याचा परिणामही दिसून येत आहे. जवळपास 15 गावांचा संपर्क तुटला आहे. पुढचे दोन दिवस जर पाऊस असाच सुरू राहिला तर कोल्हापुरात पूर परिस्थिती गंभीर होऊ शकते.


राधानगरी धरण सध्या ९०% भरलेला आहे.आज पावसाचे प्रमाण असंच राहिलं तर स्वयंचलित दरवाजे उघडले जातील . यानंतर नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे. शिवाय नदी काढच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय कोल्हापुरकरांनाही सावधतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूरवर पुराचा धोका कायम आहे. नदी काठी असणाऱ्या रहिवाशांनाही सुचना देण्यात आल्या आहेत. पाऊस असाच राहील्यास या लोकांचं तातडीने स्थलांतर केले जाणार आहे. त्यांची व्यवस्था निवारा केंद्रात करण्यात आली आहे. प्रशासन प्रत्येक गोष्टीसाठी सध्या सज्ज आहे. स्थलांतर केलं जाणार आहे. तशी सुचना देण्यात आली आहे. दरम्यान हवामान खात्याने पावसाची शक्यता ही वर्तवली आहे.