शहापूर स्मशानभूमीत हायमास्ट दिवे….

इचलकरंजी शहरात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे. इचलकरंजी येथील पंचगंगा नदीस येणाऱ्या पुरामुळे नदी तीरावरील स्मशानभूमी मध्ये पुराचे पाणी येते. त्यामुळे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार न करता अंत्यसंस्कारासाठी इचलकरंजी शहरातील शहापूर येथील स्मशानभूमीचा वापर केला जातो. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन शहरातील अंत्यसंस्कार विधी करता शहापूर येथील स्मशानभूमीचा वापर सुरू करण्यात आलेला आहे.

परंतु या ठिकाणी रात्री अतिपाऊस, वारा यामुळे महावितरणाद्वारे वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे स्मशानभूमीसह रस्त्यावर ही अंधाराचे सावट पसरलेले असते. यामुळे अंत्यसंस्कार करण्यास अडचणी येत असल्यामुळे अशावेळी पुरेसा विद्युत पुरवठा स्मशानभूमीतील परिसरात आवश्यक असल्याने आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी शहापूर स्मशानभूमी परिसरात सोलर हायमास्ट दिवा बसवण्याच्या सूचना उपायुक्त प्रसाद काटकर यांना दिलेल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार उपायुक्त यांनी विद्युत अभियंता संदीप जाधव यांनी तातडीने स्मशानभूमीच्या परिसरामध्ये हाय मास्टर दिवे बसवण्यात आले.