इचलकरंजीचा पाणी प्रश्न खूपच जोर धरत आहे. पाण्यामुळे नागरिकांना खूपच अडचणींना सामोरे जावे लागते. इचलकरंजीचा प्राणी प्रश्न खूपच दिवसांपासून भेडसावत असल्याचे चित्र आहे. नुकतीच इचलकरंजी शहरासाठी सुळकुड पाणी योजना मंजूर देखील झालेली आहे.
परंतु या मंजुरीला अनेक नदीकाठावरील गावे तसेच कागल तालुक्यातील नागरिकांचा विरोध असल्याने ही सुळकुड योजना रखडलेली आपणाला पाहायला मिळते. बऱ्याच वर्षापासून इचलकरंजी शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न नक्कीच शिंदे फडणवीस सरकार दूर करतील अशी प्रतिक्रिया खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
खा. श्रीकांत शिंदे इचलकरंजी शहरात आल्यानंतर पाणी प्रश्नावर चर्चा झाली. त्यावेळेस त्यांनी इचलकरंजीचा प्राणी प्रश्न सोडवणार असे सांगितले आहे. सर्व समस्यांवर बैठक घेऊन निश्चितपणे यातून मार्ग काढला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच इचलकरंजीचा प्राणी प्रश्न सुटेल असा दिलासा नागरिकांना मिळालेला आहे.