सर्वसामान्य माणसाना खिशाला कात्री….

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामुळ कही खुशी कहीं गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गोष्टींवर अर्थसंकल्पचा परिणाम झाला आहे आहे. या यादीमध्ये सुक्या मेव्याचा देखील समावेश आहे. बजेटचा परिणाम सुक्या मेव्यावरदेखील झाला आहे. कारण याचे दर आणखी महागले आहेत.

व्यापाऱ्यांच्या मते रुपयाच्या तुलनेत परकीय चलन महाग झाले आहे. याशिवाय सुक्या मेव्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीच्या घाऊक सुक्या मेव्याच्या बाजारात खारी बाओलीमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इराण, दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांतून सुक्या फळांचा पुरवठा केला जातो. एका व्यापाराने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 20 दिवसांत काजूसह बदामाची मागणी वाढली आहे. सर्वाधिक मागणी काजूच्या चार नगांना आहे. याचा वापर मिठाईमध्ये होतो.आगामी सणासुदीनिमित्त मिठाई बनवणाऱ्या बड्या कंपन्यांनी ड्रायफ्रुट्सची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे काजूच्या दरात मोठी वाढ झाली आहे.