मनपाडळेतील मराठी शाळेत शिरले ओढ्याच पाणी ..….

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे भरभरून वाहत आहेत. गुरुवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्र.एकमध्ये शेजारून जाणारा ओढ्याचे जोरदार पाणी शिरले आणि शाळेच्या प्रांगणासह वर्ग खोल्यात सुमारे दोन ते तीन फूट पाणी साचल्याने हे पाणी मराठी शाळेच्या समोरील मैदानावर साचून शाळेच्या इमारतीत घुसले. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या पूर्वेला व पश्चिमेला दोन ओढे वाहतात.

आज शुक्रवार पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे या ओढ्याचे पाणी शाळेच्या प्रांगणात शिरले. पावसाचा जोर वाढल्याने पावसाचे पाणी शाळेचे कार्यालय, शिक्षक कक्ष आणि वर्ग खोल्यांमध्ये सुमारे दीड ते दोन फूट इतके होते.
नाले अरुंद असल्यामुळे तसेच आजूबाजूच्या डोंगर व शेतीस परिसरातील पाण्यामुळे प्रवाह अधिकच वाढला होता. सध्या या इमारतीचे निर्लेखन करून घेतले असून, नवीन चार इमारतींसाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवला असल्याचे सरपंच रायबाराजी शिंदे उपसरपंच उल्हास वाघमारे यांनी सांगितले.