सध्या पावसाचा जोर भरपूर वाढल्यामुळे धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळीत वाढ झाल्याचे चित्र आपणास सगळीकडेच पहावयास मिळत आहे. अनेक भागात पूर परिस्थिती देखील निर्माण झाली असल्यामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांचे स्थलांतर देखील सुरू झालेले आहे. आम. राजूबाबा आवळे यांनी भेंडवडे, खोची येथील वारणा नदीच्या पाणी पातळीची पाहणी करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद देखील साधला. यावेळी हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे उपस्थित होत्या.
ग्रामस्थांनी यावेळी पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. नागरिकांनी सतर्क रहावे तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आम. राजूबाबा आवळे यांनी करून प्रशासनाला सूचना देखील केलेल्या आहेत. जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर ग्रामस्थांची राहण्याची सोय प्राथमिक शाळा व शरद साखर कारखाना येथे केलेली आहे.