मा. आम. दिपकआबा साळुंखे यांची आग्रही मागणी !

शुक्रवार २५ नोव्हेबर रोजी सिंचन भवन पुणे येथे नीरा उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातील नीरा उजवा कालव्याची सर्व प्रलंबित आणि अर्धवट कामे तात्काळ गतीशील करून तालुक्यातील शेतीला मंजूर असणारे सर्व हक्काचे पाणी टेल टू हेड प्रमाणे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली.

यावेळी बैठकीचे अध्यक्ष तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, व आमदार राम सातपुते आदिसह कालवा सल्लागार समितीचे सदस्य व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.