रेंदाळ येथे दर्गा दानपेटीतील दहा हजार रुपये लंपास

रेंदाळ येथील एसटी स्टँड जवळील हजरत वली शेरअली दर्ग्यामधील दानपेटीचे कुलूप उचकटून अंदाजे दहा हजार रुपये चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रशीद नूरमोहम्मद मुजावर राहणार शाहूनगर रेंदाळ यांनी फिर्याद दिली आहे. काही महिन्यांपूर्वी या दर्ग्यावरील गोल घुमट चोरून नेला होता त्याचा अध्याप तपास लागलेला नाही.