कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे.जिल्हाभर कोसळणाऱ्या पावसाने चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५ हजार ८४५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. दरम्यान पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी आता 47 फुटांवर पोहचल्याने कोल्हापूर महानगर पालिकेने नागरिकांच्या सुरक्षतेसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.दरम्यान महानगरपालिकेने नागरिकांना कोणती अडणच आल्यास हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून मतद मागण्याचे आवाहन केले आहे.
सततच्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात प्रशासनाने पुरग्रस्त भागात भेटी आणि मदतकार्य सुरू केल्याची माहीती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
दुसरीकडे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी काल रात्री पुरग्रस्त भागात भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्याचबरोबर मदतकार्याचा आढावा घेत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश दिले.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष, कोल्हापूर महानगरपालिका
संपर्क: 0231-2541188 आणि 8956412103
मुख्य नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल
संपर्क: 0231-2537221 आणि 8956412102