सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा (Krishna Warana River) नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून इंडियन आर्मीच्या (Indian Army) पथकाला पाचारण करण्यात आले आहे आणि सैन्य दलाची 90 जवानांसह दहा अधिकाऱ्यांची तुकडी आपल्या वाहनांच्या ताफ्यासह सांगली शहरामध्ये दाखल झाली आहे.कृष्णा पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस आणि कोयना धरणातला (Koyna Dam) विसर्ग या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती उद्भवल्यास खबरदारी म्हणून पथकाला पाचारण करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सांगलीत Indian Army चे पथक दाखल
