आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा….

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात  सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे .या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. आजराज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट् देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.