आगामी विधानसभेसाठी राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटकपक्ष आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याची व्यूहरचना आखत आहेत.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे कॉंग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळविण्यावर काँग्रेसने लक्ष केंदित केले आहे. आगामी विधानसभेसाठी राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटकपक्ष आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याची व्यूहरचना आखत आहेत. त्यात काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने मुंबई आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मित्रपक्ष शिवसेना आणि NCP यांच्याशी चर्चा करण्यासाठी समितीची घोषणा केली. या समितीमध्ये 10 नेत्यांचा समावेश आहे.