भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली महाडिक युवा शक्तीच्या अध्यक्ष पदी उरण ईश्वरपूरचे माजी नगरेसवक कपिल ओसवाल यांची एक मताने निवड करण्यात आली. निवडी नंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी इतर पदाधिकार्यांच्या निवडी पार पडल्या. यावेळी महाडीक युवा शक्तीचे संचालक मा. सतिशदादा महाडीक, सुजीत थोरात, चेतन शिंदे, सत्यवान रास्कर, जलाल मुल्ला, सोमनाथ फल्ले, फिरोज मगदूम, रितेश उर्फ बंटी अग्रवाल, विशाल शिंदे, मन्सुर वाठारकर, प्रविण चिकुर्डेकर, राजवर्धन पाटील, उपस्थित होते. यावेळी महाडीक म्हणाले, महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून जनतेची सेवा करा. सर्व सामान्य जनतेला मदतीचा हात द्या. तरूण युवकांचे संघटन उभे करा. मी त्यांच्या पाठीशी उभा असेन. दि. १६ ऑगस्ट रोजी महाडिक युवा शक्ती (Mahadik Yuva Shakti) दहिहंडीचे नियोजन केले. हा सण मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. दरम्यान महाडिक युवा शक्ती दहिहंडी उत्सव समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये प्रविण केर्लेकर, प्रकाश लाखे, जोहर जमादार, किरण देशमुख, महंमद दिवाण, शाहिद सुतार, तन्वीर मुल्ला, इंजि. अजित पाटील, सिहाल मगदूम, अजित पाटील, धिरज कबुरे, गौरव खेतमरकर, महेश क्षीरसागर, प्रध्युम्न पाटील, सुजीत साळुंखे यांचा समावेश आहे.
