इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. उरूण नावाचा समावेश सर्व शासकीय दस्तावेजमध्ये नोंद होण्यासाठी गेले २० दिवस सुरु असलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आले. आगामी सण उस्तवात नागरिकांची होणारी गैरसोय होणार नाही , यासाठी उपोषण स्थगित करण्यात येत असल्याची माहिती माजी पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवक खंडेराव जाधव , माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शहाजीबापू पाटील, राजारामबापू कारखाना संचालक शैलेश पाटील , शंकर पाटील आदी उपस्थित होते.
उरूण -ईश्वरपूर नावासाठीचे साखळी उपोषण वीस दिवसांनी स्थगित
