मंगळवेढा येथील शेतकऱ्यांचा पेढे वाटून जल्लोष!

मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये डाळींब चे सौदे लिलाव दररोज दुपारी ४ वाजता सुरू असतात. डाळींब शेतमालाचे वजन शेतकरी समोर केले जाते. माल विक्री नंतर तात्काळ रोख रक्कम अथवा ऑनलाईन पध्दतीने शेतकरी यांना देणेत येतात. मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीमधील सौदे लिलावासाठी सोलापूर, पंढरपूर,सांगोला, मोहोळ, जत व कर्नाटक राज्यातील शेतकरी आपले डाळींब विक्री साठी घेऊन येतात. त्याचप्रमाणे मंगळवेढा बाजार समिती मधील खरेदीदार हे डाळींब विक्रीसाठी दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश बिहार आसाम या राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवतात. यामुळे शेतकरी यांच्या डाळींबाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतक-यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या सौदे लिलावामध्ये दि.२५ जुलै रोजी झालेल्या सौदे लिलावामध्ये मोहन शंकर माळी फ्रुट कंपनी या आडत दुकानात सलगर तालुका मंगळवेढा येथील शेतकरी गणपत तेली यांच्या डाळींबास प्रति किलो ३०० रुपये दर मिळाला. सभापती सुशील आवताडे यांच्या हस्ते शेतकरी गणपत तेली आडत मालक मोहन माळी बाळासाहेब माळी डाळींब खरेदी केलेली व्यापारी आप्पासो पालवे यांचा सत्कार करण्यात आला.

निर्यातक्षम डाळींब दरापेक्षा जास्त दर शेतकऱ्यांला मिळाला त्यामुळे शेतक-यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. शेतीमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हा.चेअरमन बबनराव आवताडे खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांनी शेतकरी तेली यांचे कौतुक केले.