डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी उडवली खानापूर मतदार संघासह महाराष्ट्रात खळबळ….

माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव अखंड महाराष्ट्रातून केला जात आहे. अशातच विटा खानापूर मतदार संघामध्येच नव्हे तर महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे.
अशातच विट्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यामुळे खूपच चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी व त्यांच्या समर्थकांनी विट्यात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असे बॅनर त्यांनी झळकवले आहे. यामुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडालेली आहे.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे निकटचे समर्थक मानले जातात. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रहार पाटील यांचा दारुण पराभव झाल्यामुळे चंद्रहार पाटील व त्यांचे समर्थक दगाफटका झाल्यामुळे खूपच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व त्यांच्या समर्थकांनी एकनाथ शिंदे यांना झुगारून भावी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना साद घातलेली आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व त्यांच्या समर्थकांनी उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिनी त्यांचे मुख्यमंत्री असे बॅनर लावून खानापूर मतदार संघामध्ये एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलेले आहे. खानापूर मतदार संघातच नव्हे तर अखंड महाराष्ट्रात या बॅनरची जोरदार चर्चा होत आहे.