आटपाडी तालुक्यात डाळिंब बागांना पावसाचा फटका! शेतकरी चिंतेत…

सध्या पावसाचा जोर सगळीकडेच आहे पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थितीदेखील निर्माण झालेली आहे. आटपाडी तालुक्याच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण देखील आहे. या हलक्या स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका येथील डाळिंब बागांना बसला आहे.

या पावसामुळे फळ कुजवा, फुल गळती या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी खूपच अडचणीत आलेला पाहायला मिळत आहे. यामुळे दुष्काळी पट्ट्यातील डाळिंब शेती मोठी संकटात सापडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दिवसातून सारखाच हलकासा पाऊस तसेच ढगाळ वातावरण यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी पैसे, औषध खर्च करूनही तो वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त बनलेला आहे.