सांगोला तालुक्यात पाण्याच्या श्रेयवादाचे राजकारण…..

सध्या सांगोल्यामध्ये पाण्याच्या प्रश्नावरून श्रेयवादाच्या चर्चा रंगतानाचे चित्र आपणाला सध्या पहावयास मिळत आहे. सांगोला तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवते आणि हा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध देखील आहे. अशातच सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांमध्ये सिंचनासाठी निरा कालव्याचे पाणी आवर्तन सुरू झाले असून मैल 93 जवळ 480 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.

तर चिंचोली तलावही शंभर टक्के भरून देणार असल्याची ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली असून आपल्यामुळेच हे पाणी मिळाल्याचा दोन्ही नेत्यांनी दावा केल्याने सांगोला तालुक्यात पाणी प्रश्नावरून श्रेयवादाच्या चर्चा रंगताना दिसू लागल्या आहेत. एकूणच सांगोला तालुक्यात पाण्यावरून श्रेयवादाचे राजकारण चालू असल्याची चर्चा सध्या जोर देत आहेत.