रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आटपाडी येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचतर्फे बुधवारी कवी संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र
खरात यांनी दिली. आटपाडी पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता डॉ. शंकरराव खरात माणदेशी मराठी कवी संमेलन होणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन राजेश जावीर यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष विचार मंचचे अध्यक्ष राजेंद्र खरात आहेत. या साहित्य संमेलनात डॉ. रामदास नाईकनवरे, गझलकार सुधीर इनामदार, विजय पवार, मेघा पाटील, अनिता पाटील, सुखदेव नवले, अरविंद चांडवले, सुनील दबडे, श्रीकृष्ण पडळकर, डॉ. सुप्रिया कदम, अरुण कांबळे यांच्यासह अन्य कवी सहभागी होणार आहेत.