वाळवा तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक समारंभ मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. वाळवा तालुक्यातील पेठ येथे श्री संत नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी निमित्त श्री नामदेव गाथा पारायण सप्ताह सोहळा हा काल शनिवारी म्हणजे 27 जुलै रोजी सुरू झालेला आहे.
हा सप्ताह सोहळा शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट अखेर होणार आहे. यामध्ये सकाळी सात ते अकरा नामदेव गाथा वाचन, सायंकाळी सात ते नऊ कीर्तन होणार आहे. दोन ऑगस्टला म्हणजेच सांगता सोहळा या दिवशी सकाळी 9 ते 11 या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद व दुपारी चार वाजता दिंडी सोहळा होणार आहे. त्यामुळे भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.