कोल्हापूरकरांचे पुन्हा वाढले टेन्शन! धरणाचे सर्व दरवाजे उघडले…..

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या तुळशी धरणातून ही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरामुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकाचे मोठे नुकसान झाले. पूर ओसरत असल्यामुळे नागरिक निवारा केंद्रावरून परत आपल्या घरी परतले. पण आता पुन्हा पूर येण्याची शक्यता असल्यामुळे ते चिंतेत आले आहेत.

कोल्हापूरमध्ये मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला होता. हा पूर आता ओसरत असल्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला होता. पण आता कोल्हापूरकरांचे टेन्शन पुन्हा वाढले आहे.कारण कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कोल्हापूरवर पुन्हा पूराचे संकट आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोल्हापूरवर पूराचे संकट आहे. पंचगंगा नदी अद्यापही धोका पातळीवर आहे.

जिल्ह्यामधील ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण १०० टक्के भरले आहे. राधानगरी धरणाचे सर्वच्या सर्व ७ स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरणातून भोगावती नदीमध्ये ११,५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.