ओबीसींची राज्यात एल्गार यात्रा काढणार; भुजबळांची घोषणा

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. याविरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर आता भुजबळ यांनी राज्यात एल्गार यात्रेची घोषणा केली आहे. तसेच सगेसोयरे मसुद्याविरोधात हरकती नोंदवण्याचे आवाहनही केले आहे.

आपण आपल्या मुला बाळांच्या भविष्यासाठी बाहेर पडले पाहिजे. यासाठी एक तारखेला आमदार किंवा खासदार आणि तहसिलदार यांच्याकडे ओबीसी आरक्षणाच्या बाचावाच्या मागण्या देतील. लाखोंच्या संख्येने ओबीसी बाहेर पडा. आमदार आणि खासदारांना आपण बोललं पाहिजे. मतदानासाठी त्यांनी ओबीसींची गरज आहे. आपण सगळ्यांनी त्या त्या मतदार संघातील आमदारांकडे जायचे आहे, असं आवाहन भुजबळ यांनी केले.