आमदार शहाजीबापू पाटील यांची शासनाकडे मागणी

कृष्णा खोऱ्यात एकीकडे महापुराचे संकट ओढवले असताना दुसरीकडे दुष्काळी माण प्रदेशातील सांगोला व मंगळवेढ्यासह जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, माण, खटाव भागातील जनता दुष्काळाचे अरिष्ठ ओढू नये म्हणून प्रार्थना करीत आहे.त्याचा विचार करून महापुराचे वाया जाणारे पाणी दुष्काळी माण प्रदेशात वळवावे, अशी मागणी सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

यंदा कृष्णा खोऱ्यात कोल्हापूर व सांगलीत आलेल्या महापुराच्या संकटाचा विचार करता हे महापुरात वाहून जाणारे १०५ टीएमसी पाणी भीमा खोऱ्यात वळविण्याची मागणी प्रकर्षाने होत आहे. आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी हाच धागा पकडून शासनाकडे मागणी केली आहे.