अडीच लाखाच्या रोकडसह ४ लाखांचा ऐवज लंपास 

सांगोला शहरातील पंढरपूर रोड वरील बंडगर वस्ती येथे अज्ञात चोरट्यानी घराच्या दरवाजाचा कडी – कोयंडा तोडून, घरातील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ५९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम २ लाख ५० हजार रुपये असा एकूण ४ लाख ९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.

याप्रकरणी दिलीप गणपत जानकर (रा. सांगोला- पंढरपूर रोड, बंडगर वस्ती, सांगोला) यांनी सांगोला पोलीसात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या ते पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी जानकर यांच्या घराच्या दरवाजाचा कडी – कोयंडा तोडुन, घरामध्ये प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ५९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम २ लाख ५० हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले, असे फिर्यादीत म्हंटले आहे. शहरातील वाढत्या चोरीला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. शहराबाहेरील वस्तीमध्ये गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.