अनेकांना दहावीनंतर लवकरात लवकर चांगली नोकरी हवी असते.अशा परिस्थितीत तुम्ही काही चांगले कोर्सेस करू शकता ज्यातून तुम्हाला लवकरात लवकर नोकरी मिळेल आणि तुमची कमाई सुरू होईल. या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही कोर्सेसची माहिती देत आहोत जे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकता. परंतु कोणताही कोर्स तुमच्या आवडीनुसार निवडा. जेणेकरून तुम्हाला त्यात करिअर करता येईल.
डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट
दहावीनंतर विद्यार्थी डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकतात. अनेक खासगी आणि सरकारी संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा डिप्लोमा प्रोग्राम 1 वर्ष कालावधीचा असेल. या कोर्ससाठी तुम्हाला 50,000 ते 2,00,000 रुपये खर्च करावे लागतील. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे सरासरी पगार वार्षिक 2 लाख ते 4 लाख रुपये आहे.
डिप्लोमा इन डिजीटल मार्केटिंग
गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात खूप मागणी आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे सर्व विद्यार्थी डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग कोर्स निवडू शकतात. यामध्ये तुम्ही एसइओ, पे-पर-क्लिक जाहिरात, सोशल मीडिया मार्केटिंग आणि ईमेल मार्केटिंग शिकू शकता. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला 50 हजार ते 1.5 लाख रुपये खर्च करावे लागतील. हे कोर्स केल्यानंतर, एखाद्याला बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. यामध्ये सुरुवातीचा पगार वर्षाला 3 लाख ते 5 लाख रुपये आहे.
स्टेनोग्राफी आणि टायपिंग
दहावीनंतर स्टेनोग्राफीचा डिप्लोमा कोर्स करणे चांगला पर्याय आहे. न्यायालये आणि अशी अनेक सरकारी कार्यालये आहेत जिथे स्टेनो पदासाठी सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. हे डिप्लोमा केल्याने विद्यार्थ्यांना सरकारी आणि खाजगी क्षेत्रात स्टेनोग्राफर म्हणून नोकरी मिळण्याच्या भरपूर संधी उपलब्ध होतील.