हॉटेल्स व ढाब्यांच्या कचऱ्यामुळे खानापूर तालुक्यातील शेतकरी त्रस्त!

खानापूर तालुक्यातील भिवघाटचा काही भाग करंजे व काही भाग बेनापूर ग्रामपंचायत हद्दीत येतो. मात्र घंटागाडीसारखी सुविधा या परिसरात नसल्याने कुठेही व्यावसायिक कचरा टाकत आहेत. येथील हॉटेल्स व ढाब्यांच्या कचऱ्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या परिसरात हॉटेल्स, ढाबे, चायनिज सेंटर व खाद्यपदार्थांच्या दुकानांची संख्या वाढली आहे.

भिवघाट परिसरातील व्यावसायिकांनी कचरा भिवघाट-विटा रस्त्याकडेला नाल्यात टाकण्यास सुरुवात केला आहे. परिसरातील कुत्र्याच्या झुंडी हे पदार्थ खाण्यासाठी महामार्गावर वावरत असल्याने दुचाकींच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याकडेला सुलतानगादेतील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.