‘या’ महिन्यात मिळणार PM Kisan चा 17 वा हप्ता

केंद्र सरकारनं (Central Govt) शेतकऱ्यांसाठी  (Farmers) गरिबांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम सरकार करत आहे. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा होतात. ही रक्कम चार महिन्यानंतर दोन हजार रुपयांच्या हप्त्याच्या स्वरुपात जमा होते. आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

17 वा हप्ता कधी मिळणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो. म्हणजेच 17 व्या हप्त्याचे पैसे एप्रिल ते जून दरम्यान येण्याची शक्यता आहे. सध्या लोकसभा निवडणुकीमुळे देशात आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे हप्त्याचे पैसे जूनमध्येच येतील, असा अंदाज बांधला जात आहे. तर काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या काळातच 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं 2018 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती.

या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देते. आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 17 वा हप्ता देखील लवकरच जमा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दरम्यान हप्ता जमा होण्यासाठी काही गोष्टींची पूर्ताता करणं गरजेचं असतं. ती पूर्तता करावी. यामध्ये महत्वाचे म्हणजे Ekyc करणे, तसेच कागदपत्रांची पडताळणी करणे या गोष्टी महत्वाच्या आहेत. याची पूर्तता केली तरच तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता येऊ शकतो.