कोयनेतून वाढवला विसर्ग! कृष्णा नदीनं पुन्हा ओलांडली इशारा पातळी

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे.यामुळं पुन्हा एकदा कृष्णा नदीनं (Krishna River) इशारा पातळी ओलांडली आहे.

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पातळी 41 फुटांजवळ गेली आहे. तर दुसरीकडे कोयना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. यामुळं कृष्णा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयनेतून वाढवलेला विसर्ग आणि सांगली जिल्ह्यात होत असलेला पाऊस यामुळं पुन्हा कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातत्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चढ उतार होताना दिसत आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळं नागरिकांना सतर्क करण्यात आलं असून, प्रशासन देखील अलर्ट झालं आहे.