Mobile: १५ वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी! मुलांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय….

अनेक कुटुंबात मुलं मोबाईलच्या आहारी गेली आहेत. सतत मोबाईल पाहण्याचे दुष्परीणाम समोर येत आहेत. या पाश्वभूमिवर महाराष्ट्रात 15 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे. पाहूया कोणी घेतला हा क्रांतीकारी निर्णय आणि त्याला पालकवर्गाकडून कसा प्रतिसाद मिळतोय.सध्या मोठ्या प्रमाणावर लहान मुलं मोबाईलचा वापर करताना दिसतायेत. अगदी जेवण करतानाही मुलांच्या हातात मोबाईल दिसतोय.

मुलांचा स्क्रिन टाईम वाढल्यानं पालकही त्रस्त झालेत. कारण त्याचे मोठे दुष्परिणाम दिसायला लागलेत. मोबाईल दिला नाही तर मुलं चिडचिड करतात. मुलांचा हट्टीपणा वाढल्यानं ही एक मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे.हीच बाब लक्षात घेत दाऊदी बोहरा समाजाने मोठा निर्णय घेतला आहे. वयाच्या 15 वर्षापर्यंत मोबाईलवर बंदी घातली आहे. बोहरी समाजाचे 53 वे धर्मगुरू डॉ. सय्यदना आलिकद्र मुफद्दल यांनी मुंबईत नालासोपारा इथं झालेल्या प्रवचनात समाजाला आदेश दिला. हा क्रांतिकारक निर्णय असल्याचं बोललं जात आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी

  • स्पेनमध्ये मुलांच्या स्मार्ट फोन वापरण्यावर नियंत्रण
  • स्वीडनमध्ये लहान मुलांना मोबाईल वापरण्याबाबत नियम
  • आर्यलंड, फ्रान्स, कॅनडामध्ये 3 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी
  • चिनमध्ये मुलांना शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी