अरुण जानवेकर यांची हातकणंगलेमध्ये नगराध्यक्षपदी बिनविरोधी निवड…..

हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाल्यांनंतर ही पोटनिवडणूक लागली होती. यासाठी कॉँग्रेसकडून अर्चना जानवेकर, भाजपकडून उज्‍ज्वला कांबळे, तर परशुराम गवळी, संदीप कांबळे आणि नंदा चौगुले यांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. नेतेमंडळींना मान देत अखेरीस चारही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

निवड बिनविरोध करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, सुरेशराव हाळवणकर, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे नेते अरुणराव इंगवले, माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राजीव आवळे, राजू इंगवले, राहुल आवाडे, अजित काका पाटील, अजिंक्य इंगवले आदींनी प्रयत्न केले.

नगराध्यक्षपदी अरुण जानवेकर निवडून आले. मात्र, त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नी अर्चना जानवेकर यांची बिनविरोध निवड झाली. इतर चारही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने हातकणंगले नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे अर्ज दाखल केलेल्या अर्चना जानवेकर यांची बिनविरोध निवड झाली.