वडगावामधील पालिकेच्या कारभारामुळे नागरिकांची गैरसोय

गावागावांत अनेक अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागतोच. अनेक योजना सरकार कडून राबविल्या जातात. मात्र त्यासाठी अनेक त्रास देखील हा होतोच. असाच प्रकार पेठवडगाव मध्ये झाला आहे. पेठवडगाव पालिका चौक ते आंबेडकर पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पालिकेने बॅरिकेड्स लावले आहेत.

नागरिकांना विश्वासात न घेता लावलेल्या बेरिकेड्समुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. वडगाव शहरातील रस्ते अरुंद आहेत. याकडे पालिकेचे कायमपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला आहे. पालिकेच्या उदासीन व एकतर्फी भूमिकेमुळे वाहनधारक, नागरिकांची गैरसोय होत आहे.

शहरातील पुतळ्यामुळे शहराच्या इतिहासात व सौंदर्यात भर पडली आहे. बाजूने जाणारे रस्ते करण्याची गरज होती. मात्र या पातळीवर कामच न झाल्यामुळे वडगावतील रस्ते गैरसोयीचे बनले आहेत. पुतळा परिसरात वाहने सुरक्षित व हळूहळू चालविणे आवश्यक आहे, मात्र याकडे पोलिस व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.